बातम्या

केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळून दोन महिला अडकल्या

Two women were trapped when the wall of Keshavrao Bhosle Theater collapsed


By nisha patil - 7/25/2023 7:16:29 PM
Share This News:



केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळून दोन महिला अडकल्या

कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात शाहू खासबाग मैदानाची मोठी भिंत आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली .या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली  दोन महिला अडकलेल्या होत्या या दोन्ही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिकेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या ठिकाणी ढिगारा हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाने ही भिंत कोसळली . या ठिकाणी एका चार चाकीचं देखील मोठ नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
 


केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळून दोन महिला अडकल्या