बातम्या
घरफोडी प्रकरणी कोल्हापुरातील दोन तरुणी ताब्यात..
By nisha patil - 3/26/2024 9:04:15 PM
Share This News:
घरफोडी प्रकरणी कोल्हापुरातील दोन तरुणी ताब्यात..
काही दिवसांपूर्वी घडलेल्या घरपोडी प्रकरणी कोल्हापुरातील सोनतळी येथील दोघात तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलय..
रुकसाना झाडी यांनी दिलेल्य फिर्यादीनुसार सोनतळी येथील घरामध्ये पहाटे पावणेसहाच्या दरम्यान घराचा कडी कोंयडा उचकटून त्यांनी रोख रक्कम 20000 आणि तिजोरीतील 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास चालू असताना करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, या घरफोडीतील सोन्याचे दागिन्यांची विक्री करण्यासाठी दोन मुली वडणगे फाटा इथे असणाऱ्या यशवंत हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रुचून ही कारवाई करण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार शिरसागर यांनी अधिक माहिती दिली..
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक आकाशदीप भोसले जालिंदर जाधव भुनेश्वर पथकाचे सुभाष सरवडेकर सुजय दावणे विजय तडसकर रणजीत पाटील प्रकाश कांबळे अमोल चव्हाण विजय पाटील योगेश शिंदे अमित जाधव आणि मुरलीधर लांगी यांनी केली.
घरफोडी प्रकरणी कोल्हापुरातील दोन तरुणी ताब्यात..
|