बातम्या

योगाचे प्रकार

Types  Yoga


By nisha patil - 7/20/2023 7:31:35 AM
Share This News:



1) राजयोग (2) हठयोग (3) लययोग (4) ज्ञानयोग (5) कर्मयोग व (6) भक्तियोग. ज्या क्रमाने त्यांना योगशास्त्रात लिहिण्यात आले आहे, त्या क्रमाने त्यांना दर्जा व महत्व प्राप्त झाले आहे.

(1) राजयोग- यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी, हे पतंजली राजयोगाचे आठ अंग आहेत. त्यांना अष्टांग योग ही म्हटले जाते.

(2) हठयोग - षट्कर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, ध्यान व समाधी, हे हठयोगाचे सात अंग आहेत. मात्र हठयोगीचा जोर आसन किंवा कुंडलिनी जागृतीसाठी आसन, बंध, मुद्रा व प्राणायमावर अधिक असतो. यालाच क्रियायोग म्हटले जाते.

(3) लययोग - यम, नियम, स्थूल क्रिया, सूक्ष्म क्रिया, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी असे लययोगाचे आठ अंग आहेत.

(4) ज्ञानयोग - अशुध्द आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे, हाच ज्ञानयोग आहे. याला ध्यानयोग असे ही म्हटले जाते.

(5) कर्मयोग - कर्म करणेच कर्मयोग आहे. कर्माने आल्यात कौशल्य आत्मसात करणे, हा त्यामागील खरा उद्देश आहे. याला सहजयोगही म्हटले जाते.

(6) भक्तियोग - भक्ति, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सौख्य व आत्मनिवेदन असे नऊ गुण असणार्‍या व्यक्तीला भक्त म्हटले जाते. व्यक्ती त्याची आवड, प्रकृत्ती व साधना यांच्या योग्यतानुसार त्याची निवड करू शकतो. भक्ती योगानुसार सौख्य, समन्वय, आपुलकी असे गुण निर्माण होतात.

योगाची संक्षिप्त रूपे आपण पाहिलीत. या व्यतिरिक्त ध्यानयोग, कुंडलिनी योग, साधना योग, क्रिया योग, सहज योग, मुद्रायोग, मंत्रयोग व तंत्रयोग आदी अनेक प्रकार आहेत. मा‍त्र वरील सहा प्रकार मुख्य असून योगाचे अनेक प्रकार त्यात समाविष्ठ आहेत.


योगाचे प्रकार