बातम्या

निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार

Types of yoga for healthy health


By nisha patil - 6/13/2023 8:42:08 AM
Share This News:



योगासनाचे प्रकारयोगाचे नक्की किती प्रकार किती हे सांगणं तसं कठीण आहे. पण आम्ही तुम्हाला योगासनाचे प्रकार सांगणार आहोत. योगासनाचे प्रकार व फायदे  नक्की काय आहेत पाहूया. त्याचप्रमाणे व्यायामाचेही महत्त्व आणि फायदे आहेत.

राजयोग
योगाची सर्वात अंतिम अवस्था समाधीला राजयोग असं म्हणतात. या योगाला सर्व योगांमध्ये राजा मानण्यात येते. कारण यामध्ये सर्व प्रकारच्या योगांमध्ये काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. रोजच्या आयुष्यात तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून नक्की आत्मनिरीक्षण करा आणि योगसाधना करायला हवी. राजयोगाचे साधारण 8 प्रकार सांगण्यात आले आहेत – 

यम (शपथ घेणे)
नियम (आत्म अनुशासन)
आसन (मुद्रा)
प्राणायम (श्वास नियंत्रण)
प्रत्याहार (इंद्रियांवर नियंत्रण)
धारणा (एकाग्रता)
ध्यान (ध्यानधारणा)
समाधी (बंधनांपासून मुक्ती अथवा परत्माम्याशी मिलन)
ज्ञान योग
ज्ञान योगाला बुद्धीचा मार्ग समजण्यात येतो. हे ज्ञान आणि स्वतःबाबत जाणून घेण्यासाठी हा योगाचा उत्तम मार्ग आहे. याच्याद्वारे अज्ञानी माणसांना बुद्धी मिळते. तसंच यामुळे आत्म्याचीही शुद्धी होते असं म्हटलं जातं. चिंतन करताना शुद्ध स्वरूपात ज्ञानाची प्राप्ती करून घेणे म्हणजेच ज्ञान योग. तसंच योगाचे अध्ययन करून बुद्धीचा विकास करता येतो. ज्ञान योग सर्वात कठीण मानला जातो. शेवटी ज्ञानच शेवटपर्यंत टिकते असं म्हटले जाते. ज्ञानापेक्षा अधिक मोठे काहीच नाही. 

कर्म योग श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे की, ‘योगः कर्मसु कौशलम्’ अर्थात कुशलतापूर्वक काम करणे हाच योग आहे. कर्म योगाचा सिद्धांत आहे जो वर्तमानात आपण सर्वच अनुभवतो. तो म्हणजे आपले आयुष्य हे कर्मावर आधारित असते. कर्म योगाद्वारे मनुष्य कोणत्याही मोह – मायेमध्ये न फसता सांसारिक कार्य करतात आणि शेवटी परमेश्वरामध्ये लीन होतात. गृहस्थ लोकांसाठी हे उपयुक्त ठरले आहे. कर्म कोट्स आपण जाणून घेतलेच आहेत. पण योगामध्येही कर्माला अधिक महत्त्व आहे.

भक्ती योग 
भक्ती अर्थात दिव्य प्रेम आणि योगाशी जुळणे. ईश्वर, सृष्टी, प्राणी, पशु, पक्षी इत्यादींबाबत प्रेम, समर्पण भाव आणि निष्ठा यालाच भक्ती योग असं म्हणतात. भक्ती योगासाठी कोणत्याही वय, धर्म, राष्ट्र, निर्धन आणि श्रीमंत व्यक्ती असा भेदभाव करता येत नाही. प्रत्येक जण कोणा ना कोणाला तरी आपला देव मानत त्याची पूजा करतात. यालाच भक्ती योग असं म्हटलं जातं. भक्ती ही नेहमीच निस्वार्थ भावाने केली जाते. जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यातील उद्देश मिळवू शकतात. 

हठ योग
हठ योग हे प्राचीन भारतीय साधना पद्धत आहे. हठ मधील ह अर्थात हकार आणि उजव्या नासिकेतील स्वर जसे पिंगला नाडी असे म्हणतात. तर ठ अर्थात ठकार अर्थात डाव्या बाजूचा नासिका स्वर ज्याला इडा नाडी असं म्हटलं जातं. योग दोन्ही जोडण्याचे काम करतो. हट योगाद्वारे दोन्ही नाड्यांदरम्यान संतुलन राखण्यास मदत मिळते. असं मानलं जातं की, प्राचीन काळात ऋषी मुनी हे हठ योगा करत होते. या दिवसात हठ योगाची अधिक प्रचिती येत आहे. हे करण्यामुळे मनाला शांती मिळते आणि आरोग्य अधिक चांगले होते.

कुंडलिनी योगयोगानुसार मानवाच्या शरीरामध्ये सात चक्र असतात. जेव्हा ध्यानधारणा केली जाते तेव्हा ध्यानाच्या माध्यमातून कुंडलिनी जागृत करण्यात येते. यामुळे शक्ती जागृत होऊन मस्तिष्काच्या दिशेने जाते आणि या दरम्यान सर्व सात चक्रांमध्ये क्रियाशील होते. ही प्रक्रिया करण्यात येते त्याला कुंडलिनी आणि लय योग असे म्हणतात. यामध्ये मनुष्य बाहेरच्या बंधनातून मुक्त होऊन शरीराच्या आत निर्माण होणार्या शब्दांना समजण्याचा प्रयत्न करतात. ज्याला नाद असे म्हणतात. या प्रकारच्या अभ्यासाने मनाची चंचलता नष्ट होते आणि एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.


निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार