बातम्या

लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत..?

Udayanraje Bhosle has been in Delhi for two days for Lok Sabha candidacy


By nisha patil - 3/22/2024 9:26:28 PM
Share This News:



नवी दिल्ली: सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले उदयनराजे भोसले हे सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. भाजपकडून काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, यामध्ये उदयनराजे भोसले  यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, भाजपकडून या नाराजीची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. यानंतर उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी भेट घेतली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी दिल्लीकडे धाव घेतली होती. परंतु, आता दोन दिवस उलटल्यानंतरही उदयनराजे भोसले यांचा दिल्लीतच अडकून पडावे लागले आहे. 
 

उदयनराजे भोसले यांना दिल्लीत अमित शाह यांची भेट घ्यायची होती. आज-उद्या अमित शाहांची भेट मिळेल, असे उदयनराजे यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे उदयनराजे भोसले दिल्लीत थांबून आहेत. शुक्रवारी  उदयनराजे भोसले यांना अमित शाह यांची भेट मिळेल, असे सांगितले जात होते. परंतु, ही भेटदेखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला आहे. उदयनराजे भोसले यांना अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या समर्थकांच्या नाराजीत भर पडण्याची शक्यता आहे.


लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत..?