बातम्या
पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा
By nisha patil - 5/13/2024 6:28:32 PM
Share This News:
बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दुसरीकडे राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात सांगता सभांचा धडाकाही पाहायला मिळत आहे. त्यामुळेच, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदयनराजे भोसले ह्यांनी परळीत जाहीर सभा घेतली. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे, व्यासपीठावरुनच माझ्या बहिणीला निवडून द्या, असे आवाहन उदयनराजेंनी बीडच्या जनतेला केलं आहे.
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून बीड लोकसभा मतदारसंघात स्वत: उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेत पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. देशातील विकासकामे पाहता बीड जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला साथ द्यायला हवी, असे दोन्ही नेत्यांनी म्हटले. येथील लोकसभा मतदारसंघा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं जात आहे, त्यातूनच पकंजा मुंडेंविरुद्ध जातीय प्रचार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंकडून थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजेंना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. यावेळी, हॅलिकॉप्टरमधून एंट्री घेत उदयनराजेंनी व्यासपीठावर हवाच केल्याचं दिसून आलं.
पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा
|