बातम्या
विशाल पाटील यांच्या बंडखोरीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
By nisha patil - 4/16/2024 4:46:11 PM
Share This News:
उद्धव ठाकरे यांची काही वेळापूर्वीच मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. ठाकरे गटाचे मशाल गीत मंगळवारी लॉन्च करण्यात आले. तसेच नवीन चिन्ह जनसमान्यात नेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले मशालीच्या तेजाने जुमलेबाजी आणि भ्रष्ट राजवट जळून खाक होईल, याची मला खात्री आसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जबाबदारी काँग्रेसची आहे. त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी रोखावी, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्व ४८ जागा जिंकणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
“लोकसभेची लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू. ४५+ हा भाजपाचा देशातला आकडा आहे. जनतेमध्ये भाजपच्या हुकमशाहीविरोधात प्रचंड रोष आहे. हा रोष मतपेटीतून व्यक्त होणार आहे. भाजपचा राज्यात पूर्ण पराभव होणार आहे. धूळ गोळा करणारा व्हॅक्युम क्लिनर असतो तसा भाजप हा पक्षही भ्रष्टाचारी गोळा करत फिरत आहे,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम समजाला प्राधान्य देणारा आहे, अशी टीका भाजपकडून होत आहे. त्यावर स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले. ते म्हणाले, मुस्लिम लीगचा अनुभव भाजपाला जास्त आहे. कारण जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० – ४२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे त्यांचे ते जुनं नाते आहे. मोदी मिडल इस्टला जाऊन मशिदीत गेले होते, मोहन भागवत यांनी मुस्लिमांना जाऊन भेट घेतली होती त्याचा अर्थ काय होतो? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा लवकरच येणार आहे. काँग्रेस देशभरासाठी जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा सर्वसमावेश आहे. त्यात काही गोष्टी अजून टाकायच्या असतील तर आम्ही टाकू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा लवकरच होणार आहेत. त्यासाठी जाहिराती तयार करण्याचे काम सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विशाल पाटील यांच्या बंडखोरीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
|