बातम्या

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपमध्ये जाणार...? काय म्हणाले ते पहा

Uddhav Thackeray will join BJP again


By nisha patil - 4/20/2024 1:19:46 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे जोर धरू लागली असून सर्व पक्षांनी आता मोर्चेबांधनी सुरू केली आहे. राज्यात महायुतीने प्रचाराचा धडाका लावला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याचंदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घडवेल आणि दिल्लीला घेऊन जाईन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे. एका खाजगी  वाहिनीशी बोलत असताना त्यांनी हे स्पष्ट केला आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजप सोबत जाणार का...?असे विचारले असता ते म्हणाले की मी असं का करू...माझा एका पेक्षा जास्त विश्वासघात झाला आहे. माझ्या दृष्टीने भाजपचा खरा चेहरा उघडा झाला आहे.आमचं हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वपेक्षा वेगळ असून आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणार आहे तर त्यांचं हिंदुत्व हे घर जाळणार आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


उद्धव ठाकरे पुन्हा भाजपमध्ये जाणार...? काय म्हणाले ते पहा