बातम्या

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

Udyog Ratna Award presented to Tata Group CEO Ratan Tata


By nisha patil - 8/19/2023 5:10:14 PM
Share This News:



टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्रचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.रतन टाटा यांच्या निवासस्थानी उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात  योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. 


टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान