बातम्या

काका-पुतण्याचा संघर्ष आता थेट सुप्रीम कोर्टात

Unclenephew conflict now directly in the Supreme Court


By nisha patil - 2/13/2024 7:36:08 PM
Share This News:



मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार  गटाला दिलं आहे. दरम्यान शरद पवार गटाने या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात  धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून ही याचिका दाखल कऱण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने याचिकेच्या माध्यमातून केला आहे. 

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्रं दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांच्या याचिकेवर न्यायालयाने त्यांची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी आदेश देऊ नयेत, अशी मागणी करत अजित पवार गटाने यापूर्वी कॅव्हेट दाखल केले होते. 
 

जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका करताना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केलेल्या निकषांचं उल्लंघन करून निवडणूक आयोगानं हा निकाल दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर दोन्ही गटांच्या नेत्यांचा नियुक्ती अवैध ठरते, तर मग आयोगानं कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव न चिन्ह देण्याचा निर्णय घेतला? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला होता.


काका-पुतण्याचा संघर्ष आता थेट सुप्रीम कोर्टात