बातम्या

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 21 एप्रिलपर्यंत नियुक्ती प्रस्ताव सादर करावेत – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Unemployed service cooperatives should submit appointment proposals by April 21


By nisha patil - 9/4/2025 8:46:51 PM
Share This News:



बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 21 एप्रिलपर्यंत नियुक्ती प्रस्ताव सादर करावेत – जिल्हा प्रशासनाचे आवाहन


कोल्हापुरातील जिल्हा नियोजन अधिकारी व अल्पसंख्यांक अधिकारी कार्यालयासाठी शिपाई पदासाठी आणि तुर्केवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी सफाई कामगार पदासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कर्मचारी नियुक्त करायचे आहेत. या भरतीसाठी 13,039 रुपये प्रतिमाह (शिपाई) व 493 रुपये प्रतिदिन (सफाई कामगार) मानधन निश्चित करण्यात आले आहे.

हे काम करवीर व चंदगड तालुक्यातील असल्याने त्या भागातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी दिनांक 21 एप्रिल 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

प्रमुख अटी:

  • संस्थेची स्थापना ऑगस्ट 2000 नंतरची व सहकार कायदा 1960 अंतर्गत नोंदणीकृत असावी.

  • संस्थेला याआधी केलेल्या कामाचा अनुभव असावा.

  • बँक खाते राष्ट्रीयकृत/सहकारी बँकेत असावे.

  • सन 2021-22 ते 2023-24 या तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल आवश्यक.

  • क्रियाशील सदस्यांची ओळख व तपशील आवश्यक.

  • प्रस्तावासोबत संपूर्ण कागदपत्रांची साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा.


बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 21 एप्रिलपर्यंत नियुक्ती प्रस्ताव सादर करावेत – जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Total Views: 28