बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तडीपार म्हणून उल्लेख

Union Home Minister Amit Shah has been mentioned as a candidate


By nisha patil - 7/23/2024 9:57:20 PM
Share This News:



 अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या सगळ्या आरोपांना सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.
 

भाजप पक्ष कायमच  हिंसा करतो. इथला हिंदू हिंसक नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे सकल हिंदू अशी असेल भाजपची समजूत आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला भाजप का खेळवत आहे? राज्यात जातीय विषपेरणी करू नका,आरक्षणाचा तोडगा काढा. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा. तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या,  आम्हाला अमित शाह यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही असा हल्ला सुषमा अंधारे नी शहांच्यावर केला आहे


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तडीपार म्हणून उल्लेख