बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

Union Home Minister Amit Shah on Pune visit


By nisha patil - 6/8/2023 11:46:08 AM
Share This News:



केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

तारा न्यूज वेब टीम : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे आज पुणे  दौऱ्यावर आले आहेत . शहा यांच्या पुणे दौऱ्याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. त्यांचा मुक्काम तारांकित हॉटेलमध्ये आहे शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी लोहगाव विमानतळावर उपस्थित होते. पुण्यात आल्यावर शहा यांनी रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या.केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन आणि साखर महासंघाच्या कार्यक्रमासाठी गृहमंत्री शहा हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. हा कार्यक्रम रविवारी दुपारी बारा वाजता चिंचवड येथे होणार आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर