बातम्या
हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सभा संपन्न
By nisha patil - 4/5/2024 5:11:42 PM
Share This News:
हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकच्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची महाविजय निर्धार सभा पार पडली. यावेळी मंत्री महादयांचे जल्लोषात स्वागत केले.
ही निवडणूक म्हणजे देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. गेल्या साठ वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी दहा वर्षात झाली आहेत, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले, ते पुढे म्हणाले 1947 नंतर देशानी जी धोरण स्वीकारली, त्यामुळे देशाचे नुकसान झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाला सुखी समृद्धी व आर्थिक दृष्ट्या बलशाली करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. स्मार्ट शहराबरोबर स्मार्ट व्हिलेज ही झालं पाहिजे, गावातल्या युवकाला रोजगार मिळाला पाहिजे, आपल्या देशामध्ये आयात कमी व निर्यात वाढली पाहिजे, देश समृद्ध झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे ही ते म्हणाले. त्याचबरोबर शेती मधून इंधन व वीज निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 'नितीन गडकरी हे फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो' असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
भविष्य बदलून स्वप्न पूर्ण करण्याकरिता मोदींना पंतप्रधान करूयात व येथून धैर्यशील मानेना निवडून आणूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सभा संपन्न
|