बातम्या

मानगाव स्मारक लोकार्पनासाठी केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेनार-शहाजी कांबळे

Union Minister Ramdas Athawale meets Chief Minister Eknath Shinde for inauguration of Mangaon Memoria


By nisha patil - 2/13/2024 7:48:32 PM
Share This News:



महामानव भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक ऐतिहासीक मानगाव भुमीमध्ये उभारले आहे,लंडन येथील डॅाबाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थानाची प्रतीकृती २०२० पासून उभारून तयार आहे शासनाच्या उदासीनतेमुळे लोकार्पण सोहळा लांबलेला आसलेमुळे मानगाव ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,ग्रामस्त जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर अमरनउपोषनास बसले आहेत उपोशन स्थळी रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया (आठवले)च्या वतिने पक्षाचे राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.कुमार कांबळे,जिल्हाउपाध्यक्ष मा.दिपक भोसले,जिल्हा सचिव मा.सतिश माळगे(दादा) यांनी भेट दिली मानगाव राष्ट्रीय स्मारक लोकार्पण सोहळा त्वरित घेण्यात यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री ना.ऐकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाई करावी म्हनून  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री,समस्त समाजाचे नेते ना.रामदासजी आठवले यांनी पुढाकार घ्यावा असे निवेदन उपोशण कर्तानी पक्षाच्या सिस्टमंडळाकडे दिले.

या प्रसंगी पक्षाचे नेते आणी सचिव सतिश माळगे यांनी दिलेल्या घोषनामुळे जिल्हाअधिकारी कार्यालयाचा परिसर दनानून सोडला उपोषनाचा आवाज घोषनांनच्यामुळे जिल्हअधिकारी यांच्या केबिन पर्यंत पोहचला यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून तमाम आंबडकरी जनतेने या उपोषन स्थळी भेट देवून उपोषन कर्तांना पाठींबा द्यावा असे आवाहन जिल्हा सचिव सतिश माळगे यांनी केले.या आंदोलनात मानगावचे सरपंच मा.राजू मगदूम,नंदकुमार शिंगे,अक्तर हुसेन भालदार,राजगोंडा पाटील,विठ्ठल घोरपडे,प्रकाश पाटील,अमर कांबळे,सागर चव्हान,समीर जमादार,नितीन कांबळे,संबोधी कांबळे,सतिश जाधव,मानगाव ग्रामपंचायत सर्व सदस्य आदी उपोषण कर्ते उपस्थीत होते.


मानगाव स्मारक लोकार्पनासाठी केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेनार-शहाजी कांबळे