विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट ऑनलाइन देण्याचा विद्यापीठाचा निर्णय

University decision to provide online provisional degree certificate to students


By nisha patil - 6/20/2023 5:33:31 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  शिवाजी विद्यापीठाने  पदवी,पदविका तसेच पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतलाय.या  विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सांगली,सातारा व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरी करता व्यवसाय साठी पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असते ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र स्वीकारले नाही त्यांनी  विद्यापीठातील संबंधित विभागाकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात येत होते मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लक्षात घेऊन ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध केली आहे हे सर्टिफिकेट ऑनलाइन स्वरूपात मिळण्यासाठी 130 रुपये शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट ऑनलाइन स्वरूपात प्राप्त होणार आहे.


विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट ऑनलाइन देण्याचा विद्यापीठाचा निर्णय