बातम्या

उत्रे सरपंचपदी सौ.मनिषा संजय मगर यांची बिनविरोध निवड

Unopposed election of Ms Manisha Sanjay Magar as Utre Sarpanchpadi


By nisha patil - 2/4/2024 9:04:10 PM
Share This News:



पन्हाळा :प्रतिनिधी उत्रे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.मनिषा संजय मगर यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकाल ठरल्याप्रमाणे सौ.राजर्षी कृष्णात पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर निवड प्रक्रिया झाली. निवडणूक अधिकारी म्हणून पडळ मंडलाधिकारी अजय लुगडे यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी तलाठी विकास मोहिते उपसरपंच युवराज सुतार, सौ.राजर्षी पाटील, सौ.छाया पाटील, अभिजित पाटील, सर्जेराव कांबळे, ॲड.विजयसिंह पाटील, प्रधान पाटील, संजय पाटील (आबा), पांडुरंग पाटील, सरदार हांडे, कृष्णात मगर(तंटामुक्त अध्यक्ष), आनंदा मगर, यशवंत आरंडे, भिमराव पाटील (सोनार) बळवंत पाटील (पोलिस पाटील) ग्रामसेविक अमित पाटील, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.


उत्रे सरपंचपदी सौ.मनिषा संजय मगर यांची बिनविरोध निवड