बातम्या

छत्रपती संभाजीराजे यांचं सर्व खासदारांना तातडीचं पत्र

Urgent letter of Chhatrapati Sambhaji Raje to all MPs


By nisha patil - 6/12/2023 4:36:28 PM
Share This News:



छत्रपती संभाजीराजे यांचं सर्व खासदारांना तातडीचं पत्र 

दिल्लीत संभाजीराजेंच्या  हालचाली सुरू 

राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिकेला  बैठकीचे आयोजन

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत.मनोज जरांगे पाटील  यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. आता छत्रपती संभाजीराजे  महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी दिल्लीत एकत्र येण्यासाठी पत्र लिहाले आहे.  मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळकटी मिळवण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचा उल्लेख करत सर्व खासदारांना संभाजीराजेंनी एकत्र येण्याचे आवाहन  या पत्रातून केले आहे केले आहे.


छत्रपती संभाजीराजे यांचं सर्व खासदारांना तातडीचं पत्र