बातम्या
रस्ते सुरक्षा अभियान 2025: हेल्मेटचा वापर करा - प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर
By nisha patil - 1/23/2025 9:50:36 PM
Share This News:
रस्ते सुरक्षा अभियान 2025: हेल्मेटचा वापर करा - प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर
कोल्हापूर, दि. 23: प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी युवकांना आणि ग्रामस्थांना दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले. रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत नेहरू युवा केंद्र आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी (ता. करवीर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात अपघातांची कारणे, परिणाम आणि त्यांचा बचाव कसा करावा यावर माहिती देण्यात आली. तसेच राधानगरी-कोल्हापूर मार्गावर जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राचे गणेश भोसले, निलेश कांबळे, सायबर कॉलेजच्या डीन सोनिया राजपूत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा अभियान 2025: हेल्मेटचा वापर करा - प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर
|