बातम्या
खोबरेल तेल वापरा आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवा
By nisha patil - 1/4/2024 7:21:46 AM
Share This News:
तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. या वर्तुळांमुळे व्यक्तीचा चेहरा सतत तणावग्रस्त आणि त्याचबरोबर अनाकर्षक दिसू लागतो. अॅलर्जी , डोळे चोळणं , पाण्याची कमतरता ,आनुवांशिकता ,व्यसन, जीवनसत्त्वांची कमतरता आणि पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. घरगुती उपाय करून वर्तुळे कमी करता येऊ शकतात. त्यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेलाचा वापर करणे.
खोबरेल तेलाचा ‘असा’ करा वापर –
१) चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यानंतर खोबरेल तेलाने डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करा. हे तेल रात्रभर डोळ्यांच्या भोवती राहू द्यावे.
२) खोबरेल तेल आणि हळदीच्या मिश्रणानेही डोळ्याच्या भोवती लावा.
३) कच्ची हळदीच्या पेस्टमध्ये खोबरेल तेल घालून ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती लावावी. ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती लावून पंधरा मिनिटे राहू द्यावी. नंतर ओल्या कापसाने किंवा स्वच्छ, मऊ कपडा ओला करून घेऊन त्याने ही पेस्ट पुसून काढावी.४) खोबरेल तेलामध्ये थोडेसे बेसन, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध घालून हे मिश्रण डोळ्यांच्याs भोवती लावावे आणि हलक्या हाताने काही मिनिटे मालिश करावी. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा.
५) खोबरेल तेल आणि बदामाचे तेल सारख्या प्रमाणार घेऊन डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करावी. हे तेल रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या.
खोबरेल तेलामध्ये असलेले स्निध पदार्थ त्वचेला आर्द्रता प्रदान करून पोषण देणारे आहेत. अनेकदा डोळ्यांच्या भोवतीची त्वचा कोरडी पडून काळी वर्तुळे निर्माण होत असतात. खोबरेल तेलाच्या वापराने हा कोरडेपणा नाहीसा होऊन काळी वर्तुळे हे नाहीशी होण्यास मदत होते.
खोबरेल तेल वापरा आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवा
|