आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे:मान्सून पूर्व तयारी बाबत आढावा
By nisha patil - 5/30/2023 4:26:09 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवित हानी होऊ नये ,यासाठी सर्वांनी दक्ष रहावे. शोध मोहीम बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्वाधिकार्यांनी 24 तास फोन सुरू ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणातील अधिकाऱ्याने उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी बाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले ,आपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करा ,प्रतिसाद, शोध बचाव आणि तंत्र सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या यापूर्वी पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात आत्तापासूनच औषधांचा पुरेसा साठा आहे का ते पहावे तसेच वीज पुरवठा सुरळीत राहील असे महावितरण सतर्क रांहणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितलं. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्कर नौदल हवाईदल तटरक्षक दल एस .डी.आर .एफ ,मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी भारतीय हवामान खात्याचे गृह तसेच विविध विभागाचे सचिव स्तरीय अधिकारी उपस्थित होते .तर सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ,पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व्हीसीद्वारे या बैठकीस उपस्थित होते. तसेच कोल्हापुरातून जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसी द्वारे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी संजय पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते .तर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण हे कोल्हापुरतील कार्यालयांमधून सहभागी झाले होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे:मान्सून पूर्व तयारी बाबत आढावा
|