बातम्या

येरवडा कारागृहात कैद्यांकडून मोबाईलचा वापर

Use of mobile phones by prisoners in Yerawada Jail


By nisha patil - 6/30/2023 12:56:32 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहात चार मोबाईल फोन आणि तीन सिमकार्ड आढळून आले आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीमध्ये हे मोबाईल आढळून आले आहेत.या प्रकारानं खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर मोबाईल आढळून आल्यानं कारागृहातील अधिकाऱ्यांकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलच्या साह्याने मोबाईल कारागृहात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कारागृहाचे रक्षक गस्त घालत असताना मुद्रा न्यायालयाच्या परिसरातील उंच सीमा भिंती लगत एका कप्प्यामध्ये चार मोबाईलसह तीन सिम कार्ड आढळून आले आहेत. मोबाईल बॉलच्या साह्याने भिंतीच्या पलीकडून कारागृहात मोबाईल येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


येरवडा कारागृहात कैद्यांकडून मोबाईलचा वापर