विशेष बातम्या

सुळे येथील श्री रासाईदेवी मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा संपन्न

Vaastushanti and rock climbing ceremony of Shree Rasaidevi temple in Sule completed

By nisha patil - 1/3/2025 8:43:11 PM
Share This News:

सुळे येथील श्री रासाईदेवी मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा संपन्न

सुळे (ता. पन्हाळा) : ग्रामदैवत श्री रासाईदेवी मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी श्री रासाईदेवीचे मनोभावे दर्शन घेतले.

मंदिराच्या बांधकामासाठी लोकवर्गणीतून १ कोटी रुपये जमा झाले, तसेच ‘क’ वर्ग मधून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून मंदिराचे बांधकाम व शुशोभिकरण पूर्ण झाले.

या कार्यक्रमास श्री रासाईदेवी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील व अन्य समिती सदस्य, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुळे येथील श्री रासाईदेवी मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा संपन्न
Total Views: 30