कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना लसीकरण :तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
By nisha patil - 5/31/2023 5:21:57 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील 171 पुरुष आणि 161 महिला अशा जवळपास 332 हज यात्रेकरुना सीपीआर,हज फौंडेशन आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित लसीकरण कार्यक्रमात मंगळवारी लसीकरण करण्यात आले.यावेळी सीपीआरचे डॉ.अझर पटवेकर यांनी डायबेटीस रुग्णांना तसेच,गर्दीच्या ठिकाणी काही आपत्ती झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांचे मार्गदर्शन झाले. सूर्या हॉस्पिटलचे हाडरोग तज्ञ डॉक्टर अमित बूरांडे, त्याचबरोबर स्वस्तिक हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ.अर्जुन आडनाईक यांनीही विशेष मार्गदर्शन केले. पुण्याच्या आरबीआयच्या अधिकृत एजन्सीमार्फत जवळपास भारतीय 65 लाख रुपयांचे चलन बदलून 2 लाख 50 हजार रियाल हज यात्रेकरूंना देण्यात आले. हज फाउंडेशन आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माफक दरात प्रवासी बॅग सुद्धा यात्रेकरूंना उपलब्ध करून देण्यात आल्या. हज यात्रेकरूंना मेनिन जायटीस या लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हज फौंडेशन,कोल्हापूर तसेच लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी समीर मुजावर, ईकबाल देसाई हाजी बालेचांद म्हालदार, हाजी इम्तियाज बारगीर, हाजी बाबासाहेब शेख हाजी अस्लम मोमीन, रियाज बागवान, समीर पटवेकर, यासीन उस्ताद, सादत पठाण अफजल देसाई,हाजी कय्युम बागवान,हाजी नूर मुजावर,अब्दुल सनदे, असिफ पैलवान,कलीम खान,,हाजी मंजूर पाच्छापुरे,हाजी जहांगीर आत्तार,अस्लम मुल्लाणी यांनी विशेष परिश्रम घेतले
कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना लसीकरण :तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
|