विशेष बातम्या
वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी – हिंदु जनजागृती समिती
By nisha patil - 2/25/2025 5:01:17 PM
Share This News:
वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी – हिंदु जनजागृती समिती
मुंबई: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा अवमान केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने तीव्र निषेध नोंदवला आहे. हिंदु संतांचा अपमान करणे हीच काँग्रेसची संस्कृती असल्याचा आरोप समितीने केला असून, वडेट्टीवार यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
समितीने काँग्रेसवर धार्मिक लांगूलचालनाचा आरोप करत हिंदु संतांविषयी द्वेष असल्याचे म्हटले आहे. हिंदूंच्या एकीकरणामुळेच महायुतीला निवडणुकीत मोठा विजय मिळाला, असेही समितीने स्पष्ट केले. हिंदुद्वेषी विचारधारा बदलली नाही, तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही संकल्पना सत्यात उतरवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी – हिंदु जनजागृती समिती
|