विशेष बातम्या
वडगाव कोर्टातून राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता ….
By nisha patil - 3/18/2025 5:39:37 PM
Share This News:
वडगाव कोर्टातून राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता ….
वारणा कारखाना परिसरात उस आंदोलना दरम्यान झालेल्या गुन्ह्यातून आज वडगांव दिवाणी व फौजदारी न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली . यावेळी माझ्यासोबत चळवळीतील माझे सहकारी संपत पोवार,बाळासो मोरे ,प्रकाश पाटील,सतीश धुमाळ,विकास चाळके,प्रवीण पाटील, छन्नुसिंह मोहिते, सुरेश पाटील, राजू कापसे, विनायक घाटगे, अविनाश चाळके, सचिन मोरे, मारुती बोने पाटील. किरण पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्याबरोबरच लोकसभा निवडणुकी दरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कथीत कुलकर्णी देशपांडे प्रकरणी सुध्दा आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यावेळी सदर दोन्ही गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज अॅड. दीपक पाटील, अॅड सुधीर पाटील , ॲड अरुणा पाटील यांनी विनामुल्य काम पाहिले याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांचे मनापासून आभार.
वडगाव कोर्टातून राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता ….
|