बातम्या

कोल्हापुरात वैद्य गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Vaidya abortion racket busted in Kolhapur


By nisha patil - 1/17/2024 3:06:50 PM
Share This News:



वाशी नाका म्हाडा कॉलनीतील एका घरात गर्भलिंग चाचणी करून ,मुलगा होण्यासाठी विविध उपचार करू अशा थापा लावत सोनोग्राफी द्वारे प्रस्तुतीपूर्वीच गर्भलिंग निदान होत होते त्या घरात जिल्हा शहर आरोग्य पथक व महिला बालकल्याण समितीच्या पथकाने आज छापा टाकत फसवणुकीचा पर्दाफाश केला

यावेळी  अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या वस्तू वितरण करण्याचा प्रयत्न  उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी घरातून अमित डोंगरे व कृष्णात आनंद जासूद या दोघांना ताब्यात घेतल आहे यातील डोंगरे हे घर मालक असून   त्यांच्या घरामध्ये जासूद छाप टाकला यावेळी घरामध्येच सापडले स्वप्निल पाटील नावाची आणखी एक व्यक्ती पथक पोहोचतात तिथून निघून गेल्याचे समजत तो बोगस डॉक्टर असल्याचेही सांगण्यात आले आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉहर्षला वेदक सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला प्रस्तुतीपूर्वी गर्भलिंग निदान रोखण्यासाठी जिल्हास्तरावरील समिती आहे या समितीच्या सहभागाने ही कारवाई करण्यात आली माहितीनुसार वाशी नाका परिसरातील म्हाडा कॉलनीतील एका घरात गर्भलिंग चाचणी होत असल्याचे समजलं त्यानुसार तेथे जाऊन माहिती घेतली असता एका घरात सोनोग्राफी मशीन आढळलं समितीच्या कार्यकर्त्यांनी एक महिला गरोदर असूनही तिची तपासणी होते का याची खात्री करून घेण्यासाठी गरोदर महिलांची त्या पाठवलं त्या घरातील तिघा व्यक्तीने या महिलेला मुलगा व्हायचा असेल तर कोंबडा खावा तसेच रेड्याला जन्म दिलेल्या म्हशीचं दूध प्यावे असे सल्ले दिले आणि औषधाच्या गोळ्याही दिल्या मुलगा हवा असल्यास उपचारासाठी एक लाख रुपयाची मागणी केली हा सर्व प्रकार संशयास्पद होता  याचवेळी सोबतच्या आरोग्य पथकातील डॉक्टर वेदक डॉक्टर भिसे यांनी वैद्यकीय चाचणी सोनोग्राफी विषयी दोघांना प्रश्न केले असता दोघांनीही. विसंगत उत्तरे दिले तेव्हा फसवेगिरी होत असल्याचा प्रकार उघडकिस आला  यावेळी पोलिसांच्या समोर सोनोग्राफी मशीन ही ताब्यात घेण्यात आलं सोनोग्राफीच्या मशीनच्या पिशवी हळदीकुंकू लिंबू आढळून आले अशा प्रकारचे साहित्य गरोदर महिलांना देण्यात येत असल्याचे 
उघडकीस आलं


कोल्हापुरात वैद्य गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश