बातम्या

केडीसीसी बँकेला वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार

Vaikunthabhai Mehta Outstanding District Bank Award to KDCC Bank


By nisha patil - 11/9/2023 11:29:04 PM
Share This News:



केडीसीसी बँकेला वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार 
         
नाशिकमध्ये समारंभात पुरस्काराचे वितरण
           

कोल्हापूर, दि. ११: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार मिळाला. नाशिकमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमात बँकेच्या संचालिका सौ. श्रुतिका काटकर आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 
            
माजी रेल्वेमंत्री व भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या नव्या सहकार कायदा मसुदा समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश प्रभू, एमएससी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, श्रीमती शोभाताई अहिरे, असोसिएशनचे उपाध्यक्ष वसंत भुईखेडकर या  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.
             
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड -मुंबई यांच्यावतीने दरवर्षी सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँकांना या पद्धतीने पुरस्कार वितरण केले जाते. हे वर्ष पुरस्कार वितरणाचे २५ वे म्हणजेच रौप्यमहोत्सवी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होता.
            
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता पुणे विभागातील विशेष पुरस्काराने केडीसीसी बँकेला गौरविण्यात आले.
         
"मूल्यमापन आर्थिक मापदंडांचे......"
या पुरस्कारासाठी केडीसीसी बँकेच्या दि. ३१ मार्च २०२३  या आर्थिक वर्षातील मूल्यमापन झाले. दृष्टीक्षेपात बँकेचे आर्थिक मापदंड असे.........!
         
□ ढोबळ नफा: रू. २०४ कोटी
        
□ सी. डी. रेशो: ८६ ./.
           
□ सी.आर.ए.आर.: १४ टक्के
         
□ नेट एनपीए: शून्य टक्के
         
□ सर्वच म्हणजे १९१ शाखा नफ्यात

..........................

             
नाशिक: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुणे विभागातील वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू व एमएससी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते संचालिका सौ. श्रुतिका काटकर व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 


केडीसीसी बँकेला वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार