बातम्या

गुरुदत्त साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड

Vandalism of tractor transporting sugarcane of Gurudatta Sugar Factory


By nisha patil - 3/11/2023 8:23:29 PM
Share This News:



गुरुदत्त साखर कारखान्याच्या  ऊस वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरची तोडफोड th 

आंदोलन अंकुश आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक 

उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये आणि चालू हंगामातील ऊस दर मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक 

मागील हंगामातील  उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये आणि चालू हंगामातील  ऊस दर निश्चित झाल्याशिवाय   कारखानदारांनी कारखाना चालू करू नये. असे आंदोलन अंकुश आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोटरसायकल रॅलीकाढून   कळवुनही  आज टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याने  दानवाड एकसंबा  मार्गे कर्नाटक हद्दीतील ऊस गावगुंड व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात आणण्याचा प्रयत्न केला.

कारखानदाऱ्यांचा ऊस आणणेचा  प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि आंदोलन अंकुश चे कार्यकर्ते यांनी हाणून पाडला, यामध्ये दोन ऊस वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरची तोडफोड  करण्यात आली, तसेच  टायर मधील हवाही सोडून देण्यात आली.  कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून वाहतूक रोकली 
. यावेळी कारखाना कर्मचारी आणि दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात खडाजंगी झाली ,शेतकयांच्या उसास दर निश्चित केला नाही तर वाहतूक करून देणार नाही तसेच कारखाना चालू होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला


गुरुदत्त साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड