बातम्या

समाजकार्य अभ्यास अंतर्गत करडवाडी येथे विविध उपक्रम

Various activities at Kardwadi under social work studies


By nisha patil - 11/3/2024 12:26:31 PM
Share This News:



 समाजकार्य अभ्यास अंतर्गत करडवाडी येथे विविध उपक्रम

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट अधिविभागाच्या समाजकार्य भाग - 1 अभ्यासक्रम अंतर्गत करडवाडी ( ता. भुदरगड ) येथे विविध समाजकार्य उपक्रम विद्यार्थीनिंनी राबवले. विद्यार्थिनी स्नेहा शंकर कांबळे व अनुजा मनोहर साळुंखे यांनी गावामधे समुदाय संघटना साठी महिला बैठक, शेतकरी   बैठक, ज्येष्ठ नागरिक बैठक घेण्यात आल्या.
         

यावेळी करडवाडी गावातील सध्याच्या समस्या आणि उपाययोजनांबाबत चर्चा केली. करड वाडी गावचे सरपंच श्री. विनोद कांबळे व गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने शिवार फेरी केली. गावांमधील कार्यरत शाळा , अंगणवाडी,विकास सेवा सोसायटी तसेच रास्त धान्य दुकान, दूध डेअरी, स्वयं सहायता गट,आशासेविका,पोलिस पाटील पाटील यांना भेटी देवून त्यांचे कार्य जाणून घेतले.
           

 स्वच्छता जनजागृती अभियान फेरी, स्वच्छ गाव - सुंदर अंगण स्पर्धा असे विविध उपक्रम घेतले. महिला सक्षमीकरण चे महत्व पटवून देण्यासाठी पंचायत समिती भुदरगड येतील तालुका संरक्षण अधिकारी श्री. विनायक चव्हाण यांचे महिलांचे अधिकार व महिला बालविकास विभागाचे मुख्य समुपदेशक श्री. नंदकुमार निर्मळे यांचे आजची स्त्री या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमासाठी क्षेत्रकार्य मार्गदर्शक सहायक प्राध्यापक डॉ.मुनकिर मुजावर,गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवती व ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 'स्वच्छ गाव - सुंदर अंगण ' एकूण 72 कुटुंबानी भाग घेतले त्यापैकी उत्कृष्ट  ९ विजेत्यांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.


समाजकार्य अभ्यास अंतर्गत करडवाडी येथे विविध उपक्रम