बातम्या
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रम संपन्न.
By nisha patil - 1/29/2024 2:25:01 PM
Share This News:
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रम संपन्न.
कोल्हापूर:वाचनाने भाषिक समृद्धता येते.जीवन समृद्ध बनते असे प्रतिपादन महावीर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. गोपाळ गावडे यांनी केले.श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे,श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. .
डॉ गोपाळ गावडे म्हणाले की, वाचन केल्याने स्पर्धेमध्ये अधिक उंचीवर जाता येते, तसेच जीवनामध्ये समृद्धता येते.वाचाल तर नक्कीच वाचाल हा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले,सुमारे साडे दहा कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. जगातील ही 17 व्या क्रमांकाची भाषा आहे.नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मराठी भाषा,मातृभाषेला महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतूनच अधिक संवाद साधण्याचे आव्हान त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. दिपककुमार वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी केले. आभार डॉ सयाजीराव गायकवाड यांनी मानले. डॉ. पल्लवी कोडक यांनी संयोजन केले. अठरा विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे यावेळी अभिवाचन केले.
या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे प्रोत्साहन मिळाले
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रम संपन्न.
|