बातम्या

मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणार उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांची माहिती

Various activities will be implemented in the district to increase voter registration


By nisha patil - 7/18/2024 10:00:13 PM
Share This News:



विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.

 

मतदार नोंदणी वाढविण्याबाबतचा राबविण्यात येणारे उपक्रम व त्याचा कालावधी पुढीलप्रमाणे-

प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी- दिनांक 25 जुलै 2024 (गुरुवार), दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 25 जुलै 2024 (गुरुवार) ते 9 ऑगस्ट 2024 (शुक्रवार), विशेष शिबिरे- दिनांक 27 (शनिवार) आणि 28 (रविवार) जुलै 2024, विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांसाठी विशेष शिबिरे- दिनांक 1,2 आणि 3 ऑगस्ट 2024 , तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- दिनांक 3 (शनिवार) आणि 4 (रविवार) ऑगस्ट 2024,  विशेष ग्रामसभा- दिनांक 2 ऑगस्ट 2024, दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी- दिनांक 19 ऑगस्ट 2024 (सोमवार) पर्यंत व अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी- दिनांक 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) याप्रमाणे असणार आहे.


मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणार उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांची माहिती