बातम्या
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणार
By nisha patil - 7/25/2024 7:18:52 PM
Share This News:
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम - 25 जून 2024 (मंगळवार) ते 1 ऑगस्ट 2024 (गुरुवार)
प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी - 2 ऑगस्ट 2024 (शुक्रवार)
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 2 ऑगस्ट 2024 (शुक्रवार) ते 16 ऑगस्ट 2024 (शुक्रवार)
विशेष शिबीरे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर
दावे आणि हरकती निकालात काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे, मतदार यादीची तपासणी करणे व मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे व डेटाबेस अपडेट करणे व पुरवणी यादी प्रसिध्द करणे - 26 ऑगस्ट 2024 (सोमवार) पर्यंत.
अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी- 27 ऑगस्ट 2024 (मंगळवार) याप्रमाणे कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री. शेंडगे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणार
|