बातम्या

इचलकरंजी महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Various programs on the occasion of Independence Day on behalf of


By nisha patil - 8/14/2023 4:01:31 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  भारतीय  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार इचलकरंजी महापालिकेच्या वतीने 'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ .४५  वाजता भारतीय  स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारा महापालिकेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते राजाराम स्टेडियमवर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. 
महापालिकेच्या प्राथमिक शाळा, राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल तसेच शहरातील विविध खाजगी माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांच्या एन. सी. सी. एम.सी.सी. विद्यार्थ्यांच्या सहभागातून राजाराम स्टेडियमवर   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी शहरवासियांनी राजाराम स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


इचलकरंजी महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम