बातम्या

कोल्हापुरात नवरात्रीच्या नऊ दिवसांत होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन

Various programs will be organized in Kolhapur during the nine days of Navratri


By nisha patil - 9/20/2024 10:11:21 PM
Share This News:



जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात शाही दसरा महोत्सवांतर्गत विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच मागील वर्षी पासून करवीर तारा पुरस्कारही सुरु करण्यात आला आहे. याही वर्षी महिलांचा जास्त सहभाग असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.

 दसऱ्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमावेळी विविध मिरवणुकांध्ये ढोल, लेझीम, पारंपरिक नृत्य, कला तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडापटूंचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे.तसेच नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम यात पारंपरिक पोशाख दिवस, शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन, करवीर तारा पुरस्कार वितरण, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पारंपरिक युध्द कला, ई. कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कोल्हापुरात नवरात्रीच्या नऊ दिवसांत होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन