बातम्या

वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टोला, म्हणाल्या...

Varsha Gaikwads Chief Minister Eknath Shinde visited


By nisha patil - 11/22/2023 4:49:17 PM
Share This News:



 मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा. लोकांना विचारावं आणि नंतर त्यावर काम करावं. मुंबईत इको टुरिझम होत नाही. झाडे लावण्याचे काम होत नाही. ओपन स्पेस बद्दल कोणतेही प्लॅनिंग नाही. पर्यावरण खात्यासाठी स्वतंत्र आणि पूर्ण वेळ मंत्री द्यावा. असे मत कॉंग्रेसच्या माजी मंत्री आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी वक्त केलं 

काँग्रेस माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री यांनी नाले सफाईची पाहणी केली. तेव्हा पहिल्याच पावसात मुंबईत तुंबली. महानगर पालिकेच्या नालेसफाई हा एक मोठा भ्रष्टाचार होता. मुख्यमंत्र्यांनी हवा प्रदूषणाची पाहणी केली. प्रदूषणामुळे मुंबईतील प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती आजारी आहे. मात्र, चुकांची दुरुस्ती न करता आपण जे करत आहोत त्याची स्वतःहून प्रशंसा करण ही मुख्यमंत्र्याची खासियत आहे, असा टोला कॉंग्रेसच्या माजी मंत्री आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी लगावला. 
       मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा. लोकांना विचारावं आणि नंतर त्यावर काम करावं. मुंबईत इको टुरिझम होत नाही. झाडे लावण्याचे काम होत नाही. मुंबईमध्ये लाईट लावण्यावर १७ हजार कोटींचा खर्च केला. परंतु, ओपन स्पेस  बद्दल कोणतीही प्लॅनिंग करण्यात आलेली नाही. ओपन स्पेसमध्ये उद्याने तयार करावी. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून आणि पालिकेकडून अशी कोणतीही काम केली जात नाहीत अशी टीका त्यांनी केली. तसेच, पर्यावरण खात्यासाठी स्वतंत्र, पूर्ण वेळ मंत्री द्यावा अशी मागणीही यावेळी  त्यांनी केली.


वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टोला, म्हणाल्या...