बातम्या

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वसंत जिवबा पाटील यांचा अमल महाडिक यांना जाहीर पाठिंबा

Vasant Jivaba Patil an independent candidate from South Assembly Constituency

By nisha patil - 9/11/2024 11:07:19 PM
Share This News:

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वसंत जिवबा पाटील यांचा अमल महाडिक यांना जाहीर पाठिंबा

कंदलगावचे माजी सरपंच व विविध सामाजिक संस्थांचे संस्थापक वसंत जिवबा पाटील यांनी आज दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना जाहीर पाठिंबा दिला. खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीत  पाटील यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह महायुतीच्या समर्थनाचा निर्णय घेतला.

 वसंत जिवबा पाटील हे आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मतदारसंघातील विकास व प्रगतीसाठी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, मतदारांना  अमल महाडिक यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठा बळकटी मिळाली आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वसंत जिवबा पाटील यांचा अमल महाडिक यांना जाहीर पाठिंबा
Total Views: 1