बातम्या

कै.खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या समाजभिमुख प्रकल्पाचे वाशी ग्रामस्थांकडून कौतुक

Vashi villagers appreciated the community oriented project of Kharade College of Education


By nisha patil - 5/3/2024 3:10:53 PM
Share This News:



कै.खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या समाजभिमुख प्रकल्पाचे वाशी ग्रामस्थांकडून कौतुक. 

कै. बी.जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिवाजी पेठ, कोल्हापूर अंतर्गत समाजभिमुख प्रात्यक्षिक दि.2 शनिवारी वाशी ता. करवीर या ठिकाणी संपन्न झाले. या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन. ग्रामपंचायत पटांगणात गावचे सरपंच शिवाजी जाधव यांच्या मंगल हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
 

 समाजभिमुख प्रकल्पाच्या माध्यमातून शासनाच्या विविध सुविधा गावच्या जनतेपर्यंत पोहोचवणे, गावातील विविध प्रश्नांवर चर्चा करून ते प्रश्न कशा पद्धतीने हाताळावेत यावर कृती करणे, तसेच पथनाट्याच्या माध्यमातून गावचे प्रबोधन करणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू असून तोच हेतू या गावच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सफल करण्यात आला. यावेळी छात्रध्यापकांनी साक्षरता अभियान, लेक वाचवा देश वाचवा, व्यसनमुक्ती, स्त्री पुरुष समानता या प्रबोधनपर विषयावर चौकाचौकात पथनाट्य करून प्रबोधन केले. हा प्रकल्प समाजभिमुख असल्यामुळे समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत जाऊन छात्रध्यापकांनी वाशी गावातील प्रत्येक गोष्टीची माहिती घेतली.

अगदी भविष्यातील हे शिक्षक चांगल्या पद्धतीने आपल्या दारी येऊन माहिती घेत आहेत यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी सर्वांचं मन भरून कौतुक केलं. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सी. जी.खांडके, प्रकल्पप्रमुख डॉ. अंबाजी पाटील, उपसरपंच जयसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य सीमा पाटील, अरुण मोरे, सागर सावंत, श्रीधर कांबळे, डॉ. एम.आर.पाटील, डॉ.आर.एस.अवघडे,प्रा.एस.एस कुंभार आणि सर्वछत्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कै.खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या समाजभिमुख प्रकल्पाचे वाशी ग्रामस्थांकडून कौतुक