Vastu Shanti Ceremony of Sake's Turbati Temple.
साकेच्या तुरबती मंदिराचा वास्तुशांती सोहळा.
By Administrator -
Share This News:
साके, ता.कागल येथील तुरबती मंदिराचा वास्तूशाती सोहळा अमाप उत्साहात पार पडला. गावातील सर्व महिलांनी डोक्यावर आंबलीच्या घागरींसह वाजत गाजत गारवा नेला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, तालुका संघाचे संचालक बाळासाहेब तुरंबे यांच्या प्रमुख उपस्थीतीत सौ.इंदुबाई पाटील, बापू पाटील यांचे हस्ते होम हावण, सत्यनारायण पुजा असे विधीवत धार्मिक कार्यक्रम पार पडले.
गावतील मुख्य वस्तीमध्ये तुरबती हे जागृत देवस्थान आहे. गेली अनेक वर्षे या मंदिराचा जिर्णोधार झालेला नव्हता . माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसनसो मुश्रीफ यांनी 25 /15 या फंडातून सुमारे 9 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देवून या मंदीराचा जिर्णोधार पुर्ण केला आहे. लोकवर्गणीतून या मंदिराच्या कलशाचे बांधकाम होणार आहे. या सोहळ्यासाठी संपुर्ण गाव लोटला होता. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवाजी श्री.पाटील, तानाजी भुजींगा पाटील, राजाराम पाटील, डी.बी.निऊंगरे, सुनिल पाटील, राऊसो निऊंगरे, किरण पाटील, निलेश निऊँगरे , के.वाय.पाटील, सागर तुरंबे, डी.एम.मांगले, कृष्णात पाटील, अभिजित वाईंगडे, गणेश पाटील, महिपती पाटील, संदिप खराडे, अन्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
Vastu Shanti Ceremony of Sake's Turbati Temple.
|