जन्मोजन्मी हाच पती मिळावा या पवित्र भावनेने वटसावित्री पौर्णिमा संपन्न
By nisha patil - 3/6/2023 6:50:53 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकणंगले येथे हिंदू धर्मात वटसावित्री पौर्णिमेला महिलांच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व आहे.सदर दिवशी हिंदू धर्मातील महिला उपवास ठेवून आपल्या पतीसाठी परंपरेने चालत आलेल्या वडाच्या झाडाला पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सदर झाडाची मनोभावी पूजा करतात. याच परंपरेच्या अनुषंगाने आज कुंभोज परिसरात बिरदेव मंदिर,एसटी स्टँड परिसर येथे असणाऱ्या अनेक मंदिरांमध्ये हिंदू धर्मातील महिलांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन वटसावित्रीची पौर्णिमा मोठ्या उत्साहात व हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे साजरी केली.
यावेळी महिलांनी एकमेकीला हळदीकुंकू लावून सौभाग्यच देणे असणारे आपल्या पती देवासाठी मागणं मागितलं, आज सकाळपासूनच बिरदेव मंदिर व एसटी स्टँड परिसरातील वडाच्या झाडाशेजारी हिंदू धर्मातील अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात पूजा आर्ची साठी गर्दी केली होती. यावेळी ग्रामपंचायत कुंभोज यांनी वडाच्या झाडाच्या कोणत्याही तोड नकरता सर्व महिलांनी वड्याच्या झाडाची मनोभावी व सुरक्षा घेऊन पूजा करावी असे s कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ जयश्री जाधव यांनी केले होते. त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत महिलांनी गावात वृक्ष संवर्धन करत कोणत्याही झाडाची तोड न करता मनोभावे वडाच्या झाडाची पूजन केले. व वडाची झाडाच्या पूजेबरोबर झाडाला पाणी हि अर्पण केले. परिणामी सदर वटसावित्री पौर्णिमा मुळे आज बिरदेव मंदिर व परिसरात मोठे धार्मिक वातावरण तयार झाले होते. प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज
जन्मोजन्मी हाच पती मिळावा या पवित्र भावनेने वटसावित्री पौर्णिमा संपन्न
|