बातम्या

वेदा आकाश अंबानी... अंबानी कुटुंबियांनी केलं लाडक्या नातीचं नामकरण

Veda Akash Ambani Ambani family named the beloved relationship


By nisha patil - 10/6/2023 9:02:35 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी  यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता त्यांच्या लाडक्या लेकीचं नुकतचं नामकरण करण्यात आलं असून  लाडक्या लेकीचं नाव त्यांनी 'वेदा' असं ठेवलं आहे. 'वेदा' हे संस्कृत नाव असून याचा अर्थ ज्ञान असा होतो. अंबानी कुटुंबियांनी एक खास कार्ड शेअर करत नावाची घोषणा केली आहे. या कार्डवर लिहिलेलं आहे,"श्रीकृष्ण आणि धीरुभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या आशीर्वादाने पृथ्वीने त्याची धाकटी बहीण वेदा आकाश अंबानीच्या नावाची घोषणा केली आहे". या कार्डवर अंबानी आणि मेहता कुटुंबातील सदस्यांची नावेदेखील आहेत. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या नातीचं नाव 'वेदा' असं ठेवल्याने त्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ज्या मुलींचं नाव वेदा असतं त्या खूप चांगल्या असतात, पृथ्वी आणि वेदा दोन्ही नावं खूप विचार करुन ठेवलेली वाटतात, वेदा खूपच चांगलं नाव, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांना 31 मे 2023 रोजी कन्यारत्न झाले. वेदा ही आकाश आणि श्लोका यांची दुसरी मुलगी आहे. त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव पृथ्वी असून तो दोन वर्षांचा आहे. एप्रिल महिन्यात नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान श्लोका अंबानीच्या बेबी बंपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.


वेदा आकाश अंबानी... अंबानी कुटुंबियांनी केलं लाडक्या नातीचं नामकरण