बातम्या
वीर जवान संजय भोसले यांचे भावपूर्ण वातावरणात अंत्यविधी
By nisha patil - 11/7/2023 8:26:22 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) नरंदे ता.हातकणंगले गावचे सुपुत्र सजंय बाबासो भोसले यांना भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना वीरमरण आले त्यांचे वडील एम ईसीबी मध्ये काम करत असताना सेनेत काम करण्याची जिद्द ठेवून त्यांनी 2003 साली सेनेत भरती झाले त्यांनी सेवेत असताना लेह लदाख, पंजाब, दिल्ली इथे आधी सेवा केली अणि पुण्यात त्यांची 2 वर्षा पुर्वी बदली झाली होती.
4 दिवसा पुर्वी कावीळ या आजारामुळे त्यांना सेवेत असताना वीरमरण आले, भारतीय सैनदलात त्यांचा कार्यकाल उल्लेखनीय ठरला, त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात नंरदे ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली, आज सकाळी तीन वाजता त्यांचा मुत देह नरंदे येथे आणण्यात आला, नरंदे ग्रामपंचायत आवारात अंत्य दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, यावेळी गावातील विविध शाळांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली, गावातील सर्व नागरिकांनी रस्त्यावरती रांगोळी काढून, गावात श्रध्दांजली डिजिटल उभा करून भोसले यांना आदरांजली वाहिली, अंत्यविधी वेळी त्यांना शासकीय इंततमात. यावेळी हातकणंगले तहसीलदार कार्यालय, हातकणंगले पोलीस स्टेशन माजी खासदार निवेदिता माने, दलित मित्र अशोक माने, जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य प्रतापराव देशमुख, राजकुमार भोसले, बावडा कारखाना संचालक सर्जेराव भंडारी, सरपंच पूजा कुरणे, शरद कारखाना संचालक अभिजीत भंडारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने अंत्ययात्रेमध्ये समावेश झाले होते. यावेळी नरंदे ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने गावात येणाऱ्या सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते. भोसले यांच्या अचानक जाण्याने नरंदे गावावर मोठी शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहत आहेत.
वीर जवान संजय भोसले यांचे भावपूर्ण वातावरणात अंत्यविधी
|