बातम्या
लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी होणार...
By nisha patil - 1/18/2025 3:18:06 PM
Share This News:
लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी होणार...
नियम बाह्य पद्धतीचे अर्ज दाखल करणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेणार : अदिती तटकरे
पिवळे व केशरी धारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही : अदिती तटकरे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलीय. याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केलाय. पिवळे व केशरी धारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तील अर्जांची पडताळणी केली जातेय. सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे दंडासहित परत करावी लागण्याची भीती असल्याने अनेक महिला आतापासूनच लेखी अर्ज देऊन ‘लाडकी बहीण’ योजनेतून बाहेर पडत आहेत. आतापर्यंत 4 हजार महिलांनी माघार घेतलीय. आता याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केलाय.
राज्यातून दोन कोटी 63 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. दोन कोटी 47 लाख महिला पात्र ठरल्या. ज्यांच्याकडे वाहने आहेत, उत्पन्न मर्यादा जास्त आहे, इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ परत केलाय. पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आल्यास बहिणीने ते परत करावे, अशी विनंती केलीय.नियम बाह्य पद्धतीने अर्ज दाखल करणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहे. अर्ज पडताळणीमध्ये आम्हाला बोगस अर्जाबाबत माहिती मिळेल. पिवळे व केशरी धारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी होणार...
|