बातम्या

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

Veteran Marathi writer Father Francis Dibrito passed away


By nisha patil - 7/25/2024 2:29:09 PM
Share This News:



 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे थोर साहित्यिक, लेखक असून, धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.
ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन; पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज गुरुवार (25 जुलै 2024) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज पहाटे 5 च्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे.
   

   फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे थोर साहित्यिक, लेखक असून, धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेत मोठी मोहीम राबववली होती.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांचा अंत्यविधी मिस्सा हा आजच गुरुवारी 25 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे.


ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन