बातम्या

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Veteran classical singer Prabha Atre passed away due to heart attack


By nisha patil - 1/13/2024 4:24:09 PM
Share This News:



मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके  मालिका आणि चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता असते 
नुकताच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन झाले वयाच्या 92 व्या वर्षी घेतला  त्यांनी अखेरचा श्वास
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. प्रभा अत्रे आज 'स्वरप्रभा' या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं होत. वयाच्या 92 वर्षी देखील त्या गाणं गात होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत होत्या. 


ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन