बातम्या

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी शिष्ठमंडळाची सकारात्मक चर्चा..

Vice Chancellor Dr D T A positive discussion with shirke


By nisha patil - 5/4/2024 9:44:43 PM
Share This News:



दि.१ एप्रिल रोजी पार पडलेल्या छ. शिवाजी विद्यापीठ उन्हाळी सत्र परीक्षेअंतर्गत बी.कॉम भाग-३च्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर तीन च्या प्रश्न दोन मधील ए आणि बी असे १६ गुणांचे दोन चुकीचे प्रश्न काढण्यात आले. यावर विद्यापीठ प्रशासनाकडून दखल घेत पेपर सेटर ची चौकशी करण्यात येणार असुन विद्यार्थ्यांना पुन:परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
परंतु कारण नसताना नाईलाजास्तव असंख्य विद्यार्थ्यांना पेपर परीक्षा द्यावी लागणार असुन हे अन्यायकारक आहे.

 

याबाबत विवेकानंद अकॅडमिच्या अतुल नांगूरे सर आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर साहेबांकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली असता युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी तात्काळ युवासेना शिष्ठमंडळास विवेकानंद अकॅडमी येथे जाऊन विद्यार्थी वर्गाची समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार युवासेनेच्या शिष्ठमंडळाने तात्काळ विद्यार्थ्याशी संवाद साधला अन समस्या जाणून घेतल्या आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले.  यानंतर या प्रश्नी  छ.शिवाजी विद्यापीठ येथे जाऊन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

याबाबत परिस्थितीचे गांभीर्य ओळखत मा.कुलगुरू यांनी या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्ठमंडळास दिले.

या शिष्ठमंडळात युवासेना शहरप्रमुख तथा विद्यापीठ कक्ष प्रमुख मंदार पाटील, शहरप्रमुख(युवती) सौ. नम्रता भोसले, शहर सरचिटणीस कपिल पोवार,उपशहरप्रमुख(युवती)कु.निवेदिता तोरस्कर आदीनी सहभाग घेतला.


कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी शिष्ठमंडळाची सकारात्मक चर्चा..