बातम्या
विद्या प्रबोधिनी MPSC व बँकिंग निकालातील यशवंतांचे सत्कार समारंभातील मनोगत
By nisha patil - 1/5/2024 12:20:40 PM
Share This News:
कोल्हापूर 30 "स्पर्धात्मक परीक्षा मग त्या कोणत्याही असोत यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. परीक्षांचे विविध टप्पे, दीर्घ चालणारी प्रक्रिया, अभ्यासक्रमाची काठीण्यपातळी, परीक्षांचे बदलते स्वरूप, घटत्मा जागा इ. परंतू आपल्या अभ्यासापासून विचलित न होता अत्यंत प्रामाणिकपणे आणि सातत्मपूर्ण प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळतेच."
विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आयोजित MPSC राज्यसेवा आणि PSI STI ASO व बँकिंग मधील PO - Clerk परीक्षांतून उत्तीर्ण झालेल्या यशवंतांच्या सत्कार समारंभात याशावंतांनी व्यक्त केलेले हे मनोगत होय.
या वेळी प्रबोधिनी मधील आपल्या विविध मार्गदर्शकांचे आभार मानत असतानाच येथील सराव परीक्षा आणि मुलाखत मार्गदर्शनाचा विशेष फायदा झाल्याचे यशवंतांनी नमूद केले. विविध परीक्षांतून उत्तीर्ण झालेल्या तब्बल पंचवीस विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा कार्यक्रम विद्या प्रबोधिनी कोल्हापूर येथे पार पडला. विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी निकाल पहायला मिळणे दुर्लभ असून यातून विद्यार्थ्यांचे कष्ट व प्रबोधिनीच्या मार्गदर्शकांचे प्रयत्न प्रतीत होतात, सर्वांच्याच अभिनंद आणि कौतुकाचा हा निकाल असल्याचे ते म्हणाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी ग्रामीण तथा निम शहरी भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या विद्या प्रबोधिनीचा खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे समाधान त्यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील, अमित लवटे, वृंदा सलगर, नितीन कामत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्या कुलकर्णी यांनी केले.
विद्या प्रबोधिनी MPSC व बँकिंग निकालातील यशवंतांचे सत्कार समारंभातील मनोगत
|