बातम्या

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या वर्धिनीचा विक्रम – ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य पदक!

Vidya Vardhinis record in state level sports competition


By nisha patil - 2/27/2025 9:35:52 PM
Share This News:



राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या वर्धिनीचा विक्रम – ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य पदक!

विद्या वर्धिनी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचा जलवा!
बिट्स पिलानी ‘Udaan’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 

गोवा,तिसवडी: बिट्स पिलानी आणि स्पेशल ऑलिम्पिक्स भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘Udaan’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उसगाव टाकवडा गोवा येथील विद्या वर्धिनी एज्युकेशन सोसायटी स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत एकूण ८ पदके पटकावली.

संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात आपले कौशल्य सिद्ध करत ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई केली.

उच्च क्षमतेच्या गटातील यश:

➡️ १०० मीटर धावणे:

गौरवी गावडे – सुवर्ण पदक

मोहम्मद कलीम नदाफ – रौप्य पदक


➡️ शॉट पुट:

नाझ नल्लिकुन – रौप्य पदक

शादाब टोपिनकट्टी – रौप्य पदक


कमी क्षमतेच्या गटातील यश:

➡️ ५० मीटर धावणे:

अमिता वेलिप – कांस्य पदक

साईश गावडे – सुवर्ण पदक


➡️ सॉफ्टबॉल थ्रो:

सुनिता मालगोडे – सुवर्ण पदक

संयोग काणेकर – सुवर्ण पदक


विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण संस्थेचे नाव उंचावले असून, त्यांचे शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.


राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या वर्धिनीचा विक्रम – ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य पदक!
Total Views: 176