बातम्या
आणि विजय शिवतारेंनी निर्णय बदलला
By nisha patil - 3/30/2024 2:45:01 PM
Share This News:
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे महायुतीचा माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर मिटला आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात बारामती मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. याशिवाय आता माघार घेणार नाही, असा वारंवार सागितले होत. पण आता अखेर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्यानंतरही शिवतारे माघार न घेण्यावर ठाम होते. मुख्यमंत्र्यांसह महायुतीकडूनही शिवतारेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, अखेर एका फोनमुळे शिवतारे यांनी त्यांना निवडणूक लढण्याचा निर्णय बदलून माघार घेतली आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो, पण एका फोनमुळे मी माघार घेतली आणि एकनाथ शिंदेंसाठी हा निर्णय घेतल्याचं शिवतारेंनी सांगितलं आहे.
विजय शिवतारे यांनी सांगितलं की, माझी उपमुख्यमंत्र्यांसोबत एकदा फोनवर चर्चा झाली होती. दोन वेळी मुख्यमंत्र्यांसोबत समोरासमोर चर्चा झाली होती. मी ठरवलं होतं, ते करायचं पण एक फोन. एक फोन आल्यामुळे मी निर्णय बदलला. मी ऐकत नाही, यामुळे मुख्यमंत्री माझ्यावर रागवलेही. मी बैठकीतूनही निघून आलो. त्यानंतर मला 26-27 तारखेला फोन मला आला.
बापू मुख्यमंत्र्यांना तुमच्यामुळे अडचण होतेय. तुमच्यामुळे महायुतीला अडचण होतेय. सर्व ठिकाणी लोकांना एकमेकांविरोधात अपक्ष उमेदवार उभे केले, तर महाविकास आघाडीचा फायदा होऊन 22 खासदार पडतील, अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय शिवतारे ऐकत नाही म्हणून वरिष्ठ नेत्यांकडून काही गैरसमज झाले, तर ते चालणार नाही. हे त्यांनी मला सांगितलं, असंही शिवतारेंनी स्पष्ट केलं आहे.
तेव्हा क्षणार्धात त्यांच्या एका फोनमुळे मी हा निर्णय घेत आहे. 28 तारखेला रात्री 11 ते 2 दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, असंही शिवतारेंनी यावेळी सांगितलं.
आणि विजय शिवतारेंनी निर्णय बदलला
|