बातम्या
ग्रामपंचायत अधिकारी विजय आनंदोत्सव महालक्ष्मीच्या द्वारी
By nisha patil - 10/22/2024 6:45:49 PM
Share This News:
कोल्हापूर: ग्रामपंचायत अधिकारी यांचा वेतनश्रेणी त्रुटींचा जिव्हाळ्याचा विषय अत्यंत कठीण परिस्थितीत शासनाशी सुसंवाद साधून सोडवण्यात यशस्वी झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत अधिकारी पद निर्मितीचा शासन निर्णय नवरात्र उत्सवाच्या शुभ पर्वावर जाहीर झाला, ज्यामुळे तो खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसाद ठरला. त्याचा आनंदोत्सव दीपावलीच्या लक्ष्मीची भेट म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात साजरा करण्याचा निर्णय झाला.
कोल्हापूर जिल्हा युनियनने राज्य कार्यकारिणीची सभा 19 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात आयोजित केली. राज्यभरातून आलेल्या मान्यवरांचे कोल्हापूर नगरीत उत्साही स्वागत करण्यात आले. कार्यक्रम स्थळी पुष्पवृष्टी आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरचे अध्यक्ष एन. के. कुंभार, सरचिटणीस चंद्रकांत सूर्यवंशी, विभागीय उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे आणि त्यांची टीम यांनी या यशस्वी सोहळ्याची जबाबदारी एकजुटीने सांभाळली.
महाराष्ट्रभरातील ग्रामपंचायत अधिकारी युनियनने DNE136 अंतर्गत एकनिष्ठतेने आपल्या नेतृत्वाला बळकट करण्याची शपथ घेतली. या यशाचा आनंदोत्सव हा सर्वसामान्यांच्या विजयाचा प्रतीक ठरला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी विजय आनंदोत्सव महालक्ष्मीच्या द्वारी
|